भगवद्गीतेत अर्जुनाचा “गुडाकेश” असा गौरवपूर्ण ऊल्लेख केला आहे. “गुडाकेश” म्हणजे निद्रेवर विजय मिळवणारी व्यक्ती! अशा रितीने प्रत्यक्ष भगवंताने निद्रेचे महत्व दर्शविले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे गेल्या अवघ्या चाळीस वर्षात निद्रेबद्द्ल क्रांतीकारक संशोधन झाले आहे. निद्रावैद्यकशास्त्र (सोम्नोलॉजी) ही नवीन, वेगाने प्रगतीशील वैद्यकीय शाखा निर्माण झाली आहे.
खरेतर आपण सर्वजण आपल्या आयूष्याचा कमीतकमी तीस टक्के भाग “झोपेत” घालवतो. तरीदेखील स्वत:च्या झोपेबद्द्ल आपण फारतर “चांगली किंवा वाईट झोप झाली” इतकेच सांगू शकतो. झोपेमध्ये आपल्या शरीरामध्ये तसेच मेंदूमध्ये होणार्या प्रचंड घडामोडींचा आपल्याला मागमूसदेखील नसतो. किंबहुना “झोप” ही एक निष्क्रीय (Passive) अवस्था आहे अशी बहुतांश लोकांची (यात डॉक्टरांचा देखील समावेश आहे) गैरसमजूत असते. आपण लहानपणी खेळत असताना मध्येच “टाईम प्लीज” म्हणून बाहेर व्हायचो आणि थोड्या वेळाने परत खेळात सामील व्हायचो. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जिवनामध्ये “झोप” ही एक नाईलाज म्हणून घेतलेली सवड (टाईम प्लीज) आहे असे कित्येकजणांना ठामपणे वाटते. याचा परीपाक म्हणजे आपल्या समाजात कमी झोपणार्या माणसाकडे “कामसु” आणि “कष्टाळु” असे कौतुकाने पाहिले जाते. या एका गैरसमजुतीमुळे आपण स्वत:च्या प्रगतीवर आणि आरोग्यावर धोंडा मारून घेतो. झोपेबद्दल आपले अनेक गैरसमज आहेत. या लेखात मी वर उल्लेखलेल्ल्या एका गैरसमजाबद्दल विवेचन करत आहे. तसेच निद्रेत चालणार्या घडामोडींचा उपयोग शारीरीक तसेच मानसिक प्रगतीसाठी कसा करता येईल याचाही ऊहापोह असेल.
झोपेचे दोन प्रकार असतात. एकास नॉनरेम तर दुसर्याला “रेम” झोप म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या निद्रा आलटूनपालटून येतात. सर्वसाधारणता: रात्रीच्या पूर्वार्धात नॉनरेम झोप जास्त प्रमाणात तर रात्रीच्या ऊत्तरार्धात “रेम” झोप जास्ती प्रमाणात आढळते.
“रेम” झोप ही मेंदूची सर्वाधिक सक्रिय अवस्था आहे. किंबहुना आपल्या जागेपणी मेंदू जितका सक्रिय असेल त्याच्या दिडपटीने जास्त सक्रियता रेम झोपेत आढळते. आपल्या आयुष्यातील घडणार्या सुखद/दुख:द घटनांचे विश्लेषण यावेळी घडते. या घटनांची क्रमवारी केली जाऊन, कुठली घटना महत्वाची आहे आणि कुठली विस्मरणात फेकली जावी हे ठरवले जाते. आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया अनन्यसाधारण महत्वाची आहे. दिवसभरामध्ये अनेक छोट्या भावनीक घटना आपल्या आयुष्यात घडत असतात.
रीक्षावाल्याबरोबर झालेला क्षुल्लक वाद, ऑफीसमधील गडबड, रस्ता क्रॉस करताना झालेला गोंधळ इत्यादी सामान्य घटना आपण त्यावेळेला डोळ्याआड केलेल्या असल्या तरी आपल्या मनात साठून राहीलेल्या असतात. त्या भावनांचा योग्य निचरा न झाल्यास दुसर्या दिवशीचे जीवन अशक्य होईल. ज्या व्यक्तीच्या मनात नकळतपणे “नकारात्मक” भावना साचत जातात, त्यांचा भावनीक बुध्यांक (इमोशनल कोषंट) कमी होतो. गेल्या काही वर्षांमध्ये भावनीक बुध्यांक आणि व्यावसायीक जगातील यश यांचा परस्पर संबंध यावर मॅनेजमेंट विषयी लिहीणार्या अभ्यासू लेखकांनी वारंवार ऊल्लेख केला आहे. जितका भावनीक बुध्यांक जास्त तितकी व्यावसायीक आणि आर्थिक जगतातील तुमची प्रगती जास्त होते आणि नोकरीत प्रमोशन्स मिळतात. जरुरीपेक्षा कमी झोप घेणार्या व्यक्तीमध्ये भावनीक बुध्यांक कमी होतो. एका शास्त्रीय संशोधनामध्ये असे आढळले आहे की कुठल्याही कारणामुळे मग तो निद्रानाश (Insomnia) असो अथवा सवयीमुळे असो, जर सात वर्षे कमी निद्रा घेतली गेली तर मानसिक आजाराचे ( डिप्रेशन ) प्रमाण दुपटीने वाढते.
आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने केवळ भावनाच नव्हे तर नवीन सकारात्मक विचारांना (Creativity) देखील तितकेच महत्व आहे. नॉनरेम झोपेमध्ये काही विशिष्ठ प्रक्रिया घडत असतात. या प्रक्रियांमध्ये शब्दांचे अर्थ लावले जातात. अनेक नवीन शब्द आणि पूर्वी घडलेल्या घटना यांची सांगड जुळवली जाते. याने दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे वाचलेल्या शब्दांचे स्मरण घट्ट होते आणि दुसरे म्हणजे नविन विचार तयार होतात. जागेपणी ही प्रक्रीया इतक्या उत्कटतेने होत नाही. इंग्लीशमध्ये “स्लीप ऑन द प्रॉब्लेम” म्हणतात ते यालाच! खूप अभ्यास केल्यावर झोपणे हे अतिशय फायदेशीर ठरु शकते. रात्रभर जागून, झोपेचे खोबरे करुन अभ्यास खूप वाटला तरी परिक्षेच्या वेळेला फारसा उपयोगाला येत नाही कारण स्मरणशक्ती दगा देऊ शकते. अनेक महत्वाकांक्षी, ऐतिहासीक व्यक्ती झोपेचा फायदा त्यांच्या कामासाठी, नवीन विचारांसाठी करुन घेतात. लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध उदाहरण ही बाब सिद्ध करते. काळ्या पाण्याची शिक्षा सुनावल्यानंतर लोकमान्यांना मागील दरवाज्याने थोड्या काळाकरीता एका छोट्या खोलीत आणण्यात आले. त्यांच्यावर नजर ठेवणार्या एका मराठी सबइन्सपेक्टरला लोकमान्यांनी १५ मिनीटे झोपण्याची परवानगी मागितली. एवढ्या गंभीर परिस्थितीत हे झोपू कसे शकतात? हा प्रश्न आश्चर्यचकीत पोलिसाने विचारल्यावर लोकमान्यांचे उत्तर होते की त्यांना अपिलाची तयारी करायची होती आणि नवीन पद्धतीचा विचार करण्यासाठी झोपेची मदत घेतली! हे एक हुकमी झोपेचे उदाहरण आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ “केक्युले” ह्याला बेन्झीन रिंगची कल्पना झोपेमध्ये सूचली.
मेंडेलीफ, बकमिनिस्टर फुलर, बाजीराव पेशवा अशी अनेक मंड्ळी झोपेचा उपयोग करून घेताना दिसतात. या व्यक्तींची दुर्दम्य महत्वाकांक्षा त्यांना हुकूमी झोपेकडे घेऊन गेली. परंतु आता तंत्रज्ञानामुळे सामान्य व्यक्तीला देखिल हुकूमी झोप साध्य करता येऊ शकेल. अर्थात थोडी मेहनत आणि मानसिक शिस्ता यांची जरुर असते.
माझ्या अनेक आर्किटेक्ट मित्रांचा असा अनुभवा आहे की त्यांचा विशिष्ठ निद्राविकार बरा झाल्यानंतर त्यांना अनेक नवीन कल्पना सुचू लागल्या त्यामुळे त्यांची व्यावसायीक भरभराट झाली. मानसिक तणावामुळे झोप नीट होत नाही, परंतु यापेक्षा मोठे सत्य म्हणजे चांगली झोप नसेल तर मानसिक तणाव कित्येक पटीने वाढतो. चांगली झोप येण्यासाठी मनाबरोबरच शरीराचादेखील विचार करणे महत्वाचे ठरते. निद्राशास्त्राच्या अनुसार नीद्रानाशाची कारणे मनापेक्षादेखील मेंदू आणि शरीराशी निगडीत असतात. तंत्रज्ञानाचा वापर करून ही कारणे शोधता येतात आणि उपचार देखील करता येतात. केवळ झोपेच्या गोळ्या घेणे हा तात्पुरता ऊपाय झाला.
थोडक्यात “स्वस्थ निद्रा” म्हणजे खर्या अर्थाने भावनीक, वैचारीक आणि पर्यायाने “सुखी मुद्रेची” गुरुकिल्ली आहे.